Back
Next





Ketkar/Joshi(Ketkar) KulaSammelan - Badoda (26-Jan2020)


या वर्षीचे "केतकर / जोशी-केतकर कुल संम्मेलन", रविवार, २६ जानेवारी २०२० रोजी विंटेज हॉटेल, बडोदा
येथे पार पडले. या संम्मेलनास ७० हुन अधिक कुलबांधव उपस्थित होते.

या संम्मेलनाचे प्रमुख पाहुणे, श्री. शाम भुर्के हे होते. संम्मेलनची सुर्वात दीपप्रज्वलन, राष्ट्रगीत, श्री. हेमंत केतकर
यांनी लिहिलेय आणि सौ. माधवी केतकर आणि श्री हेमंत केतकर यांनी सादर केलेलया गीताने झाली.
दिवंगत कुलावासियांना श्रद्धांजली अर्पण करून पुढील कार्यक्रमाची सुरवात झाली.

या संम्मेलनात श्री. चंद्रशेखर पाटील यांचे “बडोदा शहर आणि त्याचे महत्व ” यावर व्याख्यान, डॉ. शाम जोशी
आणि संजीवनी जोशी
यांचे “आयुर्वेद आणि स्वास्थ्य रक्षण ”यावर व्याख्यान, श्री. शाम भुर्के व सौ. गीता भुर्के
- यांचे “विनोदाची मेजवानी” हा कार्यक्रम, पंडित कुटुंबीय यांचे “सुगम संगीत गायन”, AGM, अहवाल वाचन, अध्यक्षीय भाषण, ज्येष्ठांचा सत्कार, लकी-ड्रॉ, असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

या संम्मेलनाची सांगता सभासदांचे मनोगत, आभारप्रदर्शन आणि नवीन सदस्यांच्या सोबत कार्यकारिणीच्या सभेनंतर
झाली.



या संम्मेलनास हजर राहून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या दिलेल्या प्रतिसादाबद्दल केतकर कुलसभेच्या वतीने सर्व कुलबांधवांचे एकदा पुन्हा मनःपूर्वक आभार.